जुन्नर/आंबेगाव तालुक्याचे विकासाचे केंद्र असलेला श्री विघ्नहर सहकारी साखर कारखाना सभासदांचे मालकीचा होत असताना कार्यक्षेत्रातील सभासदांचे मुलांना शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्याचा विशाल दृष्टीकोन समोर ठेवून, त्याची सुरवात श्री विघ्नहर ट्रस्ट मार्फत औद्योगिक प्रशिक्षण संस्था ऑगस्ट १९९१ चे सत्रापासून सुरु झाली.
स्व. निवृत्तीशेठ शेरकर खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत
१) वेल्डर
२) प्लास्टिक प्रोसेसिंग ऑपरेटर
३) कॉम्पुटर ऑपरेटर आणि प्रोग्रामिंग असिस्टंट
४) फिटर
५) मशिनिष्ट (ग्राईंडर)
६) इलेक्ट्रिशियन
७) मेकनिक मोटार व्हेईकल
असे सात व्यवसायाचे एकूण १७ युनिट असून त्यांना केंद्र सरकार व महाराष्ट्र सरकार व महाराष्ट्र सरकारची विना अनुदान तत्त्वावर कायमस्वरुपी मान्यता आहे.
औद्योगिक प्रशिक्षण संस्था सुरु करण्याचा मुख्य उद्द्येश स्वयंरोजगार हा आहे. ज्यांना प्रशिक्षणानंतर स्वत:चा व्यवसाय सुरु करावयाचा आहे त्यांच्या मार्गदर्शनाची व्यवस्था संस्थेमार्फत राबविण्यात येत आहे.
तांत्रिक शिक्षण हे इतर शिक्षणांचे तुलनेत अत्यंत खर्चिक असे आहे. ग्रामीण विभागातील तरुणांनी या शिक्षणापासून केवळ शहरातीक खर्च न परवडल्याने वंचित राहू नये म्हणून ही सोय ते राहत असलेल्या परिसरात व्हावी, हा उदात्त दृष्टीकोन ठेवून कारखान्याच्या सहकार्याने मु. निवृत्तीनगर (धालेवाडी), पो. शिरोली बु.||, ता. जुन्नर जि. पुणे. हा परिसर तंत्रशिक्षणाचे पुढील क्षेत्रासाठी निवडला आहे.
ऑगस्ट १९९१ या सत्रापासून केंद्र व महाराष्ट्र शासनाने औद्योगिक प्रशिक्षण संस्था, मु. निवृत्तीनगर (धालेवाडी), पो. शिरोली बु.||, ता. जुन्नर जि. पुणे. येथे खालील व्यवसाय अभ्यासक्रम सुरु करण्यासाठी मान्यता दिलेली आहे. या अभ्यासक्रमासाठी अत्याधुनिक यंत्रसामुग्री संस्थेने उपलब्ध करून दिलेली आहे.तसेच शैक्षणिक उपक्रम राबविण्यासाठी अनुभवी व कुशल तंत्र शिक्षकांची नियुक्ती केलेली आहे.