प्रवेश नियम:
या योजनेखाली शैक्षणिक सत्र वर्षातून एकदाच म्हणजे प्रत्येक वर्षाच्या ऑगस्ट महिन्यामध्ये सुरु होते. संस्थेमध्ये शासनाच्या नियमानुसार उमेदवारांना प्रवेश दिला जातो. प्रवेशासाठी आवश्यक असलेल्या इतर अटी पुढीलप्रमाणे :-
-
१४ वर्षे पूर्ण व त्यावरील वयाच्या उमेदवाराला उच्च वयोमर्यादा लागु नाही.
-
कारखाना कार्याक्षेत्रातील सभासद शेतकऱ्यांच्या तसेच कारखाना कामगारांचे मुलांना प्राधान्याने मेरीटनुसार प्रवेश दिला जाईल.
-
अर्जासोबत मागितलेल्या प्रमाणपत्रांची समक्ष अधिकाऱ्याने साक्षांकित केलेल्या सत्य प्रती न जोडल्यास अर्ज नामंजूर केला जाईल. संस्थेमार्फत संस्थेत असलेल्या अनुभवी व त्या विषयांतील ताज्ञ शिक्षकांकडून योग्य असे मार्गदर्शन मिळवून व वरील कोर्स चे संबंधित सत्र यशस्वीरीत्या पूर्ण करून सर्व सत्रांमध्ये उत्तीर्ण होणारे प्रशिक्षणार्थी केंद्र सरकारकडून मिळणारे नशनल ट्रेड सर्टिफिकेट मिळवणेस पात्र राहतील.
शारीरिक क्षमता :-
या शिक्षण क्रमात भाग घेणाऱ्या उमेदवारास वैयक्तीक – वैयक्तीक तपासणी करून घ्यावी लागेल व त्यांचे प्रमाणपत्र प्रवेश घेतेवेळी सादर करावे लागेल. सदर तपासणी योग्य ठरल्यानंतर त्यास अभ्यासक्रम चालू ठेवण्याची अनुमती देण्यात येईल.
निवड पद्धती :-
शासनाने आखून दिलेल्या नियमाप्रमाणे प्रवेश दिले जातील.
संमती पत्र :-
ज्या उमेदवारास प्रवेश दिला जाईल त्यास संस्थेकडे आपण संस्थेच्या शिस्तीचे पालन करू, ताब्यात दिलेल्या साधन-सामग्रीची काळजी घेऊ, प्रशिक्षण मध्येच सोडून देणार नाही. शासनाने व संस्थेने घातलेल्या सर्व अटीचे पालन करू, अशा प्रकारचे लेखी संमतीपत्र द्यावे लागेल. वर दिलेल्या लेखी संमतीनुसार न वागणाऱ्या व मध्येच सोडून गेलेल्या प्रशिक्षणार्थ्याकडून प्रशिक्षणावर केलेला सर्व खर्च व एकूण फी वसूल करणेचा अधिकार संस्थेस राहील. तसेच प्रवेशासाठी फी भरल्यानंतर कुठल्याही सबबीवर फी परत मिळणार नाही.
शिस्त उपस्थित :-
शिस्त उपस्थिती या बाबतचे सध्याचे आणि वेळोवेळी होणारे नियम प्रशिक्षणार्थ्यावर बंधनकारक राहील. यापैकी कोणत्याही नियमाचे प्रशिक्षणार्थ्याकडुन उल्लंघन झाल्यास तो प्रशिक्षणार्थी संस्थेतुन काढुन टाकण्यास पात्र राहील. प्रशिक्षणार्थ्याने जर त्याला प्रवेश दिलेला व्यवसाय शिकण्याबाबत उचीत प्रगती दाखवली नाही तर त्याची प्रशिक्षणातुन ताबडतोब मुक्तता करण्यात येईल. अशा प्रशिक्षणार्थ्याकडुन संपुर्ण फी व प्रशिक्षणावर झालेला खर्च वसुल केला जाईल.
प्रशिक्षण शुल्क :-
प्रशिक्षण शुल्काबाबत सविस्तर माहिती संस्थेच्या कार्यालयात मिळेल.
सवलती :-
संस्थेमार्फत खेळ, करमणुक व वैद्यकीय मदतीची सोय उपलब्ध करण्यात येईल.
परीक्षा व प्रमाणपत्र :-
प्रशिक्षणार्थ्याच्या प्रगतीचा आढाव घेण्यासाठी संस्थेमध्ये प्रत्येक महिन्याची व तिमाही चाचणी परिक्षा घेतल्या जातील.
ऑगस्ट २०१३ पासून ओद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील सर्व व्यवसाय अभ्यासक्रमासाठी केंद्र शासनाने सहा महिन्याचे सत्र (सेमिस्टर) पद्धत लागू केलेली आहे. प्रत्येक सत्र संपल्यानंतर जानेवारी आणि जुलै महिन्यामध्ये शासनातर्फे सत्रांत (सेमिस्टर) परीक्षा घेतली जाईल.
सर्व सत्र परिक्षा पास झाल्यानंतर नॅशनल कौन्सील फॉर व्होकेशनल ट्रेनिंग; गव्हर्नमेंट ऑफ इंडिया डायरेक्टोरेट जनरल ऑफ इम्प्लोयमेंट ऍण्ड ट्रेनिंग यांचे मार्फत नॅशनल ट्रेड सर्टिफीकेट मिळवण्यास प्रशिक्षणार्थी पात्र राहिल.
अर्ज असा भरावा :-
माहिती पत्रक आणि प्रवेश अर्जाचा नमुना स्व. निवृत्तीशेठ शेर्कर खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था, मु. निवृत्तीनगर (धालेवाडी), पो. शिरोली बु.॥, ता. जुन्नर, जि. पुणे येथील कार्यालयात कामचे दिवशी रु. १००/- रोख भरुन मिळु शकतील. योग्य माहीती भरलेले प्रवेश अर्ज वरील कार्यालयात कामाचे दिवशी सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत स्विकारले जातील.
प्र्त्येक प्रशिक्षणार्थ्यास प्रवेश अर्जासोबत गुणपत्रकाच्या व दाखल्याच्या सत्य प्रती जोडणे आवश्यक आहे. मुळ प्रमाणपत्र प्रवेश घेतेवेळी जमा करवी लागतील.
कार्यालयीन वेळ:
सुट्टीचे दिवसांखेरीज सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत कार्यालय चालु राहील.